नाशिकच्या दुर्घटनेवरून पुणे महापालिका झाली खडबडून जागी: शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सीजन यंत्रणेची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी (दि. 21 एप्रिल) ऑक्सीजनची गळती झाली आणि त्यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने तब्बल 24 जणांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला असताना या घटनेने व्यवस्था आणि यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या घटनेचा धसका घेत पुणे महापालिका खडबडून जागी  झाली आहे. पुणे शहरातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालयांना रुग्णालयांमधील ऑक्सीजन यंत्रणेची तपासणी करून सद्यस्थितीचा अहवाल महापालिका प्रशासनाला देण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

पुण्यामधील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. सध्या श्रांत 1200 पेक्षा जास्त रुग्ण व्हेंटीलेटरवर तर साडेपाच हजरांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्सीजनवर उपचार घेत आहेत. पालिकेने खबरदारी म्हणून ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची व्यवस्था आहे; अशा सर्व रुग्णालयांना तात्काळ त्यांची ऑक्सिजन पुरवठा आणि साठा करण्याच्या यंत्रणेचा सुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शासकीय रुग्णालयांची कंत्राटे खासगी ठेकेदारांना दिलेली असल्यामुळे त्याची नैमित्यिक देखभाल दुरुस्ती होत असते. तसेच बायोमेडिकल इंजिनीयरची नेमणूक करण्यात आलेली असते. अशा पद्धतीची व्यवस्था खाजगी रुग्णालयांमध्ये असेलच असे नाही. ऑक्सिजनच्या सुरक्षेचा मुद्दा थेट रुग्णांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्याचाही सूचना देण्यात आल्या आहेत. अशी दुर्घटना घडू नये याकरिता विशेष खबरदारी बाळगण्याचा आणि तज्ज्ञांमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचनाही महापालिकेकडून सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

शहरात पालिकेच्या आणि खासगी अशा 162 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची सुविधा आहे. त्यातही शहरातील बडे खासगी रुग्णालय आणि पालिकेचे जम्बो, बाणेर कोविड सेंटर, दळवी रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *