भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई


पुणे– एका भंगाराच्या दुकानातून तब्बल ११०५  काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट एकने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (१४ जून)  देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने पुणे शहर आणि परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या ऑपरेशनदरम्यान, पोलिसांनी गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. या धाडीत पुणे पोलिसांना ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे आणि ९७० बुलेट लीड अशी एकूण ११०५ काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ही काडतुसे जप्त करत भंगार व्यावसायिक सरोज याला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन

या भंगारव्यावसायिकाने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात काडतुसे कुठून आली, ती कशासाठी आणली आणि तो ही कोणाला देणार होता, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love