100th All India Natya Samelan : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा (100th All India Natya Samelan inauguration ceremony) पुण्यात ५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची (cultural programs) रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुगगंटीवार(Sudhir Mungantiwar), निमंत्रक उदय सामंत(Uday Samant) यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद(All India Maratahi Natya Parishd), पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले(Meghraj Rajebhosale) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (Organized various cultural programs in Pune on the occasion of 100th All India Natya Samelan inauguration ceremony)
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी नाट्य परिषद पुणे शाखेचे विजय पटवर्धन,दीपक रेगे, समीर हंपी, सत्यजित धांडेकर,सुनील महाजन,अण्णा गुंजाळ,अशोक जाधव,चेतन चावडा, योगेश सुपेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, ५ जानेवारी २०२४ सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत भव्य अशा गणेश कला क्रीडा मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, सकाळी ८ वाजता, पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ५०० दुचाकी आणि १० रथावर विराजमान झालेल्या ज्येष्ठ कलाकारांचा आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० पात्रांचा समावेश या रॅली मध्ये असणार आहे.
सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पुजन होऊन, कार्यक्रमांना प्रारंभ ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या सुरेल नाट्य संकीर्तनाने होणार आहे. सकाळी ११ वाजता, ३५ कलाकारांच्या साथीने डॉ. भावार्य देखणे यांचे ‘बहुरूपी भारुड’ सादर होणार आहे. दुपारी १२:३० वाजता “नाटक माझ्या चष्म्यातून” हा परिसंवाद होणार आहे, यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी आमदार उल्हासदादा पवार, सूर्यदता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी होणार आहेत याचे सूत्रसंचालन राजेश दामले करतील
दुपारी १:३० वा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि रेश्मा वर्षा परितेकर यांचा ४० नृत्यांगनाच्या संचासह पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी २:३० वा. दीडशेहून अधिक कलाकारांच्या ताफ्यात “छत्रपती शिवाजी महाराजांचा नयनरम्य शिवराज्याभिषेक सोहळा” संपन्न होणार आहेत. दुपारी ३ वा. २० गायक कलाकारांसह निनाद जाधव आणि रवींद्र खरे, “नाट्य धारा” हा नाट्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा शुभारंभ सोहळा पूर्वसंध्येला सायंकाळी ५ वा. होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाचे निमंत्रक आणि उद्योगमंत्री उदय सामंत विशेष अतिथि म्हणून ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त शशी प्रभू, डॉ. रवी बापट, विश्वस्त मोहन जोशी , अशोक हांडे, गिरीश गांधी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ६ वा. गायक राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांचा बहारदार नाट्य गीतांचा कार्यक्रम सादर होईल. आणि रात्री ८ वाजता, ५० प्रतिययश गायक वादक कलाकाराच्या साथीने, संदीप पाटील प्रस्तुत मराठी गीतांधी मुरेल संगीत रजनी लखलख चंदेरी” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे, तरी अधिकाधिक पुणेकरांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.