#कौतुकास्पद:आबा बागूल यांच्या पुढाकाराने साकारतय 100 ऑक्सीजन बेडचं हॉस्पिटल


पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार  विचार करून काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्तरावर मेडिकल टीम तयार करून ऑक्सीजन बेडची सुविधा आपापल्या भागात उपलब्ध करून देऊन इतर लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श उभा केला आहे. मनसेचे नगरसेवक यांनी पुण्यातील साई स्नेह हॉस्पिटलच्या सहाय्याने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सीजन बेडचे हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. आता नगरसेवक आणि पुणे मानपातील कॉँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी पुढाकार घेत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील मित्र परिवाराच्या पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या पुणे महापालिकेच्या श्री गणेश कला क्रीडा मंदिराच्या मोकळ्या हॉलमध्ये 100 ऑक्सीजन बेडची सुविधा कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या 1-2 दिवसांत रुग्णालयाप्रमाणे सर्व सुविधांची तयारी झाल्यानंतर हे रुग्णालय सज्ज असेल असे आबा बागूल यांनी सांगितले.

अधिक वाचा  मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांची अनोखी मानवंदना

शहरातील काही देणगीदार आणि नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नाने गणेश कला क्रीडा मंचाच्या येथे 100 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला . या ठिकाणी ऑक्सिजनचा स्वतंत्र प्लँट बसवला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या रूग्णालयात ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, अशी माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन माणसांचे जीव वाचवणे आवश्यक असून प्रत्येक लॉकप्रतिनिधीने अशा प्रकारचे काम करणे गरजेचे आहे. केंद्राचे, राज्याचे , मानपाचे पैसे घ्या किंवा देणगीदार मिळवा परंतु सर्वांनी अशा प्रकारचे काम आपापल्या भागात उभे करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. मी जे काम करतो आहे त्यामध्ये मला कुठलेही श्रेय नको, लोकांचा जीव महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील मोकळ्या हॉलमध्ये अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू करण्याबाबत आपण मनपाच्या आयुक्तांकडे याबाबत कल्पना मांडली. त्यांनी टीम आहे का विचारल्यानंतर आमच्या मित्र परिवारातील डॉ, ऋतुपर्ण  शिंदे यांनी त्यांची टीम काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यांच्याबरोबर डॉ. निखिल हिरेमठ, डॉ. संदीप पाटील, डॉ. अश्विनी जोशी आणि त्यांचे आणखी 15 डॉक्टर हे काम करण्यास तयार झाले. त्यांनी केरळहून यासाठी 60 नर्सेस मागवल्या आहेत. त्याचबरोबर आया, वॉर्ड बॉय अशी सर्व टीम तयार असून येत्या 1-2 दिवसात काम पूर्ण होऊन हे हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज असेल असे आबा बागूल यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love