Hema Malini involved in painting

हेमा मालिनी पेंटिंगमध्ये सहभागी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- देशातील ३५० हून अधिक महिला चित्रकारांच्या ‘आकृती’ ग्रुपतर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन शनिवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले.यावेळी, प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती’ ग्रुपच्या  पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या 50 महिला चित्रकार, साधारण ८ फुट रुंद व १८ फुट लांब, कॅनव्हासवर पुणे फेस्टिवलच्या प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा’ असलेला लोगो, हाताने पेंट केला. कॅनव्हासच्या दोन्ही बाजूला ४-४ अशा अष्टविनायकाच्या प्रतिमा पेंट करून ‘पुणे फेस्टिव्हल’ला भेट म्हणून दिल्या. या कॅनव्हासवर अभिनेत्री , नृत्यांना व पुणे फेस्टिव्हल च्या पॅट्रन खा. हेमा मालिनी यांनाही हातात ब्रश घेऊन रंगवण्याचा मोह आवरता आला नाही.

सोना शर्मा (पंजाब, क्रिएटीव्ह हेड , पहाडी नॅचरल्स), राखी अगरवाल (दिल्ली), स्वाती केणे (नागपूर), नेहा उपाध्याय (उत्तराखंड), अथर्व रानडे(वाशीम), डॉ. रत्नावली दातार (पुणे), आरती यादव (पुणे), अपेक्षा जैन (इंदोर , मध्य प्रदेश), अदिती राय दत्ता (पश्चिम बंगाल), आरीया नायर (केरळ),त्रिवेणी , शिल्पा इर्दे , दिनेशा या महिला चित्रकारांनी हा कॅनव्हास रंगवला.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन,  पंचशील,  सुमाशिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत.   भारतफोर्ज,   कुमार रिअॅलीटी,  आहुरा बिल्डर,  बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *