आनंदाची बातमी : पुण्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे— काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यामध्ये आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यापासून पुणे शहरात सरासरी दररोज 100 च्या आसपास रुग्ण आढळत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृतांच्या आकडेवारीत मोठी घट झालेली आहे.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळून आला होता. तेंव्हापासून पुणेकर कोरोनाचा धीराने सामना करत आहेत. महापालिका आणि इतर प्रशासन देखील याचा प्रकोप कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच लस आल्यामुळे हे काम अधिकच सोपे झाले होते. तरीही शहरात अजूनही कोरोना रुग्णाची संख्या आढळून येतेच आहे. मात्र आता ही संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. कारण गेल्या कित्येक दिवसानंतर शहरातील अॅक्टीव रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. ती आता ९८८ झाली आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

अॅक्टीव रुग्णाच्या संख्येतही घट

शहरात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. मात्र आता त्याचा जोर कमी होताना दिसतो आहे. त्यासाठी महापालिकेच्या  उपाययोजना कामी आलेल्या दिसून येत आहेत. त्याला नागरिकांची देखिल चांगलीच साथ मिळाली आहे. कोरोनाचा  कहर सुरु झाल्यापासून महापालिकेच्या वतीने विभिन्न उपाय योजना राबवल्या आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारची साथ मिळाली. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या लस आल्यामुळे कोरोनाच कहर कमी होण्यात चांगलीच मदत मिळाली. लसीकरणात देखील राज्यात पुणेच पुढे आहे. एवढे करूनही शहरातील अॅक्टीव रुग्णांची सख्या कमी होत नव्हती. मात्र, आता गेल्या दोन आठवड्यापासून याचा जोर पहिल्यापेक्षा कमी होताना दिसतो आहे. कारण आता अॅक्टीव रुग्णाची संख्या देखील कमी होताना दिसते आहे. गेल्या कित्येक दिवसानंतर अॅक्टीव रुग्ण संख्या हजाराच्या खाली आहे. अर्थातच रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शहरात दररोज मृत्यू होत होते. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात शून्य मृत्यू आढळले होते. त्यानंतर आताच ही संख्या शून्य वर आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *