शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने केली १० वाहनांची तोडफोड


पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने १० वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रात्री ही घटना घडली आहे.  दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने १२ वाहनांची तोडफोड केली होती.

निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता निलेश जाधव त्यांच्या ऑफिससमोर पार्क केलेल्या कारमध्ये लॅपटॉप ठेवत होते. त्यावेळी सर्व आरोपी तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटा घेऊन कार, दुचाकी वाहनांवरून डबल, ट्रिपलसीट आले.

अधिक वाचा  अपहरण करून मुलीवर बलात्कार

एकाने निलेश जाधव यांच्याकडे बोट दाखवून ‘हा होता का’ अशी विचारणा केली. ‘याला आपण जिवंत सोडायचे नाही. याला संपवून टाकू’ असर म्हणत एकाने तलवारीने निलेश यांच्यावर वार केले. त्यानंतर आरोपींनी निलेश यांना पळवून मारहाण केली. ‘कोणाच्यात दम असेल तर बाहेर या’ असे म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. तसेच काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.पिंपरीत रात्री उशिरा दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानुसार दुसऱ्या गटातील १०० जणांचे टोळके दुसऱ्या गटाला मारण्यासाठी गेले. मात्र तो न भेटल्याने २१ दुचाकीवरून आलेल्या आणि स्थानिक अशा एकूण १०० जणांनी तलवारी आणि कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, मात्र नेहरू नगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे.

अधिक वाचा  का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर? काय म्हणाले नगरसेवक?

घटनास्थळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त, गुन्हे शाखा आणि पिंपरी विभागाचे सहाय्यक आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love