प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ येमुल (येमुल गुरुजी) यांना पोलिसांनी या कारणावरून केली अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल (वय 48) यांना पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात उद्योजक कुटुंबातील गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, दिपाली विरेंद्र पवार, भागीरथ पाटील आणि राजु अंकुश (रा. औंध) यांच्या यांच्यावर यापुर्वीच भादंवि कलम 498 (अ), 323, 325, 406, 420, 606, 34 सह हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरून अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ येमुल याने आरोपी गणेश गायकवाड याला अघोरी सल्ले देऊन “तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. त्यामुळे तुझे सर्व ग्रह फिरले आहेत. म्हणून तू आमदार व मंत्री होणार नाहीस. त्यामुळे लवकरात लवकर तिला सोडचिट्ठी दे.  मी देतो ते लिंबू तिच्यावर उतरविल्यावर तुझ्या मागची कायमची पीडा निघून जाईल’ असे सांगितले होते.

 त्यामुळेच गणेश गायकवाड यांनी तक्रारदार महिलेला त्रास देऊन तिच्यासोबत अघोरी वर्तन केले होते.ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पीडित महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ट व अघोरी त्याचा वापर केला आहे. तसेच तिचा संसार मोडण्यासाठी त्यांच्या बेडरूम बाहेर हळदी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या मारलेला लिंबू ठेवण्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व तक्रारी तथ्य आढळल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली आहे.

दाखल गुन्ह्यात आरोपी येमुल याचा सहभाग असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्याचा तपास करण्यासाठी चतुःश्रृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *