पंतप्रधानांच्या समोर अजित पवारांनी राज्यपालांना लगावला टोला


पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत, आपल्याला महामानावांचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यात राजकारण न आणता पुढे जावं लागेल, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. छत्रपतींना स्वराज्य स्थापलं. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कुणाबद्दलही माझ्या मनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूद करतो, असंही अजित पवार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी हा टोला लगावला.

अधिक वाचा  विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकारताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे- राज्यपाल कोश्यारी

पुण्यात मेट्रो सुरू होण्यास १२ वर्षे लागली. पुणेकरांना मागच्या काही वर्षात मेट्रो तयार होण्यास त्रास झाला. पुणे ते पिंपरी चिचवड लवकरात लवकर मेट्रो व्हावी अशी माझी विनंती आहे. तसेच पुण्यातील मुख्य नद्या असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि पर्यावरणाला कोणताही धोका न होता याचे काम करावे लागेल. पुण्यातील नद्यांच्या पूर नियंत्रण रेषेचा विचार करून नद्यांचे ण व्हावे असे अजित पवार म्हणाले.पुणे मेट्रोप्रमाणेच पुण्यातील इतर प्रकल्पांसाठी देखील मदत करण्याची विनंती यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love