पुणे — “होली के दिन दिल मिल जाते है
रंगों मे रंग मिल जाते है…”
असेच रंगात रंग मिसळून पुण्यात आजी माजी खासदारांची होळी अन् धुळवड साजरी झाली. होळी, धुळवडच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग लावत रंगांची उधळण करीत होळी आणि धुळवड साजरी केली.
पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट हे राजकारणातील भन्नाट व्यक्तिमत्त्व. नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार असा बापट साहेबांचा प्रवास राजकारण आणि समाजकारणात काम करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून सलग पाचवेळा गिरीश बापट विजयी झाले आहेत. पाच वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले बापट साहेब सध्या पुण्याचे खासदार आहेत. पुण्यासह महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात त्यांचा अनुभव प्रदीर्घ असून त्यांचे योगदान देखील बहुमूल्य आहे.
होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर बापट साहेबांसोबत रंग खेळून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांनी प्रार्थना केली तर, खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.
बापट आणि काकडे या आजी माजी खासदारांनी एकमेकांना लावलेले रंग येणाऱ्या भविष्यात नव्याने राजकीय रंग भरतील काय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल.