जगविख्यात भविष्यवेत्ता कीरोच्या दृष्टीने तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य

अध्यात्म
Spread the love

माणसाला भविष्यकाळाचा वेध घ्यायला आवडते. भविष्यात काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते, याच उत्सुकतेमुळे ज्योतिष शास्त्र Astrology जन्माला आले. मानवाने ग्रहांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांवर कोणता प्रभाव पडतो ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. हातापायाच्या रेषांवरून भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. शकुन, अपशकुन, स्वप्न यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. नंतर ग्रहांबरोबरच अंकांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो हा अनुभव घेतला. त्यासाठी अंकांचे रहस्य उलगडण्याचा, अंकांचा प्रभाव जाणण्याचा प्रयत्न हजारो वर्षांपासून होत आहे. अर्थात अंकशास्त्राचा Numerology शास्त्रशुद्ध अभ्यासाचा इतिहास मात्र फारसा प्राचीन नाही.

आपल्या भारत देशात ऋषीमुनींना अंकांच्या शक्तीची जाणीव होती. त्या शक्तीचा उपयोग त्यांनी तंत्र-मंत्रात केला. पण ती विद्या त्यांनी पुढच्या पिढीला दिली नाही. बरीच गुपिते गुपितेच राहिली. तंत्रांचे अंक चक्र आतासुद्धा सापडतात पण काहींचे फळ काय आहे मात्र समजत नाही.

अंक शास्त्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे व ते सुलभ पद्धतीने मांडण्याचे श्रेय पाश्चिमात्य विद्वानांकडेच जाते. त्या विद्वानात कीरोला cheiro महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी चार हजार वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या अंक शास्त्राचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी पूर्व बंबिलोनिया, खाल्डिया भारत इजिप्त इत्यादी देशांचा प्रवास केला व या विषयाचा गहन अभ्यास करून सांगितले की अंक, ग्रह व राशी यांच्यात परस्पर गूढ़ संबंध आहे. एवढंच काय पण यांचा आठवड्याच्या दिवसांशीसुद्धा संबंध आहे. या परस्पर संबंधांची नाडी अज्ञात शक्तीच्या हातात आहे. अंक, ग्रह, राशी मानवी जीवनातील घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

कीरोने बॅलिलोनियन व खाल्डियन अंक शास्त्रावर Ballionian and Chaldean numerology आधारित जन्म-तारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्टये, आरोग्य, महत्वपूर्ण घटना, व्यक्तीतील क्षमता, यांचे वर्णन केले आहे. यात सायन सूर्याच्या संचारानुसार ग्रेगोरियन कॅलेंडरचे वर्षातील बारा महिने व राशी चक्राच्या बारा राशी यांची सांगड घालण्यात आली आहे. जानेवारी – मकर, फेब्रुवारी – कुंभ, मार्च – मीन, एप्रिल – मेष, मे – वृषभ जून – जुलै – कर्क, ऑगस्ट – सिंह, सप्टेंबर – कन्या, ऑक्टोबर – तूळ, नोव्हेंबर- वृश्चिक, डिसेंबर धनू.

सायन सूर्य मास एक तारखेपासून सुरू होत नाही. तर २१ तारखेला किंवा त्या तारखेच्या जवळच्या तारखेला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.  सुरुवातीचे सात दिवस राशी – संधी काळ असतो या संधीकाळात आधीची व आगामी राशीची संधी असते. त्यावेळी जन्मलेल्या व्यक्तींवर दोन्ही राशींचा प्रभावपडतो. त्यावेळी आधीच्या राशीचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो  नवीन राशीचा प्रभाव वाढत जातो. नवीन राशीचा पूर्ण प्रभाव २८ तारखेला सुरु होतो व ती रास पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत पूर्ण प्रभावी राहते. शक संवत मासाची सुरुवातही ग्रेगोरियन मासाच्या २२ तारखेला किंवा त्या जवळच्या तारखेला होते.

परंपरागत ज्योतिषात वेगवेगळ्या राशींचे स्वामी ग्रह इथेही आढळतील. सिंह – रवी, कर्क – चंद्र, मेष – मंगळ, वृश्चिक- मंगळ,  मिथुन व कन्या बुध, धनु -गुरू, मीन – गुरू, वृषभ – शुक्र, तूळ – शुक्र, मकर व कुंभ – शनी.

कीरोने त्याच्या गणनेत युरेनस व नेपच्यूनची समावेश केला आहे. अर्थात या ग्रहांना कोणत्याही राशीचे स्वामीत्व स्वतंत्रपणे दिलेले नाही. तर युरेनसला रवी बरोबर आणि नेपच्यूनला चंद्राबरोबर संयुक्त स्थान दिलेले आहे. त्या ग्रहांच्या गुणामुळे त्याने असे विभाजन केले असावे. या नऊ ग्रहांमध्ये नऊ मूलांकाचे विभाजन केले आहे. रवी – १, चंद्र – २, मंगळ – ९, बुध – ५, गुरु – ३, शुक्र- ६. शनी- ८, युरेनस – ४, नेपच्यून – ७.

परंपरागत ज्योतिष व कीरोद्वारा प्रतिपादित केलेले अंक-ज्योतिष यात काही फरकही आढळतात. परंपरागत ज्योतिषशास्त्रात विषम राशींना (मेष, मिथुन सिंह, तूळ, धनु व कुंभ) या तेजस्वी (Positive) व सम राशींना ( वृषभ, कर्क कन्या, वृश्चिक, मकर, मीन) या राशींना सौम्य (Negative) मानलेले आहे. कीरोने दुहेरी स्वामीत्व असणाऱ्या, ग्रहांची पहिली रास तेजस्वी (Postive) दुसरी तर दुसरीरास सौम्य मानली आहे. त्यानुसार मेष, वृषभ, मिथुन, धनु,मकर या  तेजस्वी राशी आहेत तर कन्या, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या सौम्य राशी आहेत . याशिवाय सिंह, तेजस्वी रास आहे तर कर्क- सौम्य राशीप्रमाणेच त्याचा स्वामी तेजस्वी किंवा सौम्य असतो.

कीरोने म्हटले आहे, “ज्योतियांनी प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या मानव जातीला स्वतःच्या अनुभवाने जे ज्ञान दिले आहे. त्याच आधारावर प्रत्येक महिन्याचा मूळ अर्थ समजावून सांगितला आहे. त्याच बरोबर खाल्डियन अंक शास्त्रानुसार प्रत्येक तारखेला ग्रहांचा कोणता प्रभाव पडतो हे स्वत:च्या अनुभवाच्या आधारावर सांगितले आहे.”

जन्मतारखेनुसार भाग्य जाणून घेण्यासाठी वाचकांनी आधी त्या महिन्याचे फल जाणून घ्यावे. नंतर मूलांकानुसार त्या तारखेचे फल पाहावे. उदाहरणार्थ, तुमचा जन्म १० ऑक्टोबरला झाला असेल तर आधी त्या महिन्यातील सर्वसाधारण प्रवृत्तीविषयीचे स्पष्टीकरण वाचावे व नंतर १० = १ + ० = १ या मूलांक असणाऱ्या व्यक्तीविषयी दिलेले स्पष्टीकरण वाचावे.

नवीन तारखेची गणना कोणत्या वेळेपासून करावी हा प्रश्न निर्माण होतो. पाश्चात्त्य कॅलेंडरनुसार रात्री बारापासून नवीन वार सुरू होतो. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार सूर्योदयापासून नवीन वार सुरू होतो. काही भारतीय अंक शास्त्रज्ञांच्या मते नवीन तारखेच्या अंकांची गणना सूर्योदयानंतर करावी. याचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म सूर्योदयापूर्वी झाला असेल तर त्याची जन्म तारीख आदल्या दिवशीची मानावी, कीरोने याविषयी काहीही म्हटले नाही. पण त्यांनी पाश्चात्य कॅलेंडरनुसारच तारीख मानली असावी असे वाटते.

याबाबत एक गोष्ट आवर्जुन सुचवावीशी वाटते की रात्री १२ पासून सूर्योदयापर्यंतचा वेळ तारीख संधीची वेळ मानली जावी. कारण या तारीख संधीकाळात जन्मलेल्या व्यक्तींवर दोन्ही तारखांचा प्रभाव आढळतो. आधीच्या तारखेचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो व नवीन तारखेचा प्रभाव हळूहळू वाढत जातो.

अंक शास्त्रात मूलांकांना खूपच महत्व आहे. हे मूलांक आहेत एक ते नऊ पर्यंतचे अंक. कोणत्याही अंकाचे रूपांतर मूलांकात करता येते. त्यासाठी एकम्, दशम्, सहस्र या अंकांची बेरीज करावी. बेरीज नऊ पेक्षा जास्त होत असेल तर एकम्, दशम्, या अंकांची बेरीज करावी उदाहरणार्थ ९ + २ चा मूलांक काढायचा असेल ९ + २ = ११ = १+१=२ म्हणजेच ९२चा मूलांक आहे २. तसेच ६२७५ या संख्येचा मूलांक काढायचा असेल तर ६ + २ + ७ + ५ = २० = २ + ० = २

पुढच्या भागात आपण जन्मतारखेनुसार भाग्य जाणून घेण्यासाठी आधी त्या महिन्याचे फल जाणून घेऊन मूलांकानुसार त्या तारखेचे फल पाहणार आहोत.

साभार – तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *