#Shri Ram Panchayat Yaga at ‘Dagdusheth’ Ganapati Temple :’दगडूशेठ’ गणपती मंदिरात ‘श्रीराम पंचायतन यागा’ सह रामनामाचा जयघोष 

Shrimant Dagdusheth Halwai Ganapati, Shrimant Dagdusheth Halwai Public Ganpati Trust , Suvarnayug Tarun Mandal, Ayodhya , Shriram Temple, Ramlalla Pranpratistha, Shri Ram Panchayat Yag, Shri Ram Jap, Dagadusheth Ganpati Temple, Ram Naam Jayagosh,
Shrimant Dagdusheth Halwai Ganapati, Shrimant Dagdusheth Halwai Public Ganpati Trust , Suvarnayug Tarun Mandal, Ayodhya , Shriram Temple, Ramlalla Pranpratistha, Shri Ram Panchayat Yag, Shri Ram Jap, Dagadusheth Ganpati Temple, Ram Naam Jayagosh,

Shrimant Dagdusheth Halwai Ganapati | Shri Ram Panchayat Yag:  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट(Shrimant Dagdusheth Halwai Public Ganpati Trust), सुवर्णयुग तरुण मंडळ(Suvarnayug Tarun Mandal) तर्फे अयोध्येतील(Ayodhya ) प्रभू श्रीराम मंदिर(Prabhu Shriram Temple)  लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा ( Ramlalla Pranpratistha ) सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा प्रारंभ श्रीराम पंचायतन याग(Shri Ram Panchayat Yag )आणि श्रीराम जप(Shri Ram Jap) याने झाला. गणपती बाप्पा मोरया…सह रामनामाच्या जयघोषाने(Rama Naam Jayagosh)  दगडूशेठ गणपती मंदिराचा(Dagadusheth Ganpati Temple) परिसर दुमदुमून गेला.(Chanting of Ram Nama with ‘Shri Ram Panchayat Yaga’ at ‘Dagdusheth’ Ganapati Temple)

श्रीराम पंचायन यज्ञाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. राजोपचार पूजा व गणेश वंदना , गणेश याग , श्रीराम भद्र मंडल, गणेश भद्र मंडल स्थापना, गणेश दुर्वा अर्चन, नवग्रह हवन करण्यात आले. तसेच पहाटे ६ वाजता श्रीराम जप देखील देखील मंदिरात पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे 'यंग इंडिया के बोल' स्पर्धा

माणिक चव्हाण म्हणाले, शनिवारी, दि. २० जानेवारी रोजी मंदिरात सायंकाळी ५ वाजता सामुहिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण ५० महिला करणार आहेत. पठणात सहभागी होणा-या महिला श्रीराम मंदिर अयोध्या तीर्थ क्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरिजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या गीता परिवार पुणे या संस्थेतील आहेत. यावेळी श्रीराम पंचायतन याग मध्ये आर्ष रामायण (वाल्मिकी रामायण) मधील बाल कांड हवन , श्रीराम सहस्त्रनामावली हवन , श्री सिता सहस्त्र नामावली हवन  व तुलसी अर्चन होईल.

रविवारी, दिनांक २१ जानेवारी रोजी रामायणातील सुप्रसिद्ध सुंदर कांड हवन, श्रीमद हनुमद सहस्त्र नामावली हवन, भीमरूपी स्तोत्र पठण होणार आहेत. तर, दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम लक्ष तुलसी अर्चन व पूणार्हुती होईल. याशिवाय सोमवारी सकाळी ११ वाजता श्री सालासर हनुमान चालीसा मंडल, पुणे तर्फे संगीतमय हनुमान चालीसा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध भजनांच्या चालीवर आधारित ११ संगीतमय हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम होणार आहे. मंडलाचे प्रशांत मुंदडा,सचिन जाजू, धिरज मुंदडा, प्रशांत राठी, निलेश जाजू, निलेश सारडा यांनी संयोजन केले आहे.

अधिक वाचा  आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन : चंद्रकांत पाटलांचा कंठ आला दाटून

दुपारी १२.३० वाजता श्रीं ची महाआरती होणार असून मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात येईल. मंदिराबाहेर आणि उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे सकाळपासून प्रसाद वाटप देखील होणार आहे. तरी भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love