पुणे-चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव विजयादशमीपर्यंत (२५ ऑक्टोबर) साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
देवीचे दर्शन आणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे आणि या संकेतस्थळांवर पाहाता येणार आहे. भाविकांसाठी ङ्गेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मु‘य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क‘ीन लावण्यात आली आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
देवीची आरती दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ११ या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.