संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

पुणे-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आषाढी वारीसाठी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका शिवशाही एसटी बसने आळंदीतून पंढरपूरला सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाल्या. कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, शेतकऱयांना, कष्टकऱयांना व गोरगरीब जनतेला चांगले दिवस येऊ दे, असे साकडे वारकऱयांनी विठ्ठलाला घातले.

आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला श्रीक्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पंढरीची वाट धरतात. मात्र, वारी सोहळय़ावर यंदाही कोरोनाचे सावट असल्याने पायी वारी रद्द करण्यात आली. तथापि, वारीची परंपरा जपण्यासाठी एसटी बसमधून पादुका पंढरपूरला नेण्यास परवानगी देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर एसटी सोहळा पंढरीकडे रवाना झाला. तुकोबांच्या पादुका पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात सकाळी पाच वाजल्यापासून विविध धर्मिक कार्यक्रम झाले. सकाळी साडे आठच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या दोन एसटी बसमधून पादुका मार्गस्थ झाल्या. पादुकांसोबत पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे अध्यक्ष, चोपदार, विणेकरी, पालखीचे भोई, चौघडा, गरुडटक्का, पताकाधारक वारकरी, पखवाज वादक, टाळकऱयांसह एकूण 40 वारकरी बसमधून पंढरपूरला निघाले. या बससमवेत पंढरपूरपर्यंत व परत येईपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

आळंदीत पहाटे पवमान अभिषेक, सकाळी आठ वाजता कीर्तन पार पडले. त्यानंतर पादुका पूजन व आरती पार पडली. त्यानंतर माउलींना नैवेद्य दाखवण्यात आला. कर्णा झाल्यानंतर हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी एसटी बसपर्यंत चालत जात माउलींच्या पादुका मोजक्मया चाळीस लोकांच्या समवेत टाळ-मृदंगाच्या गजरात एसटी महामंडळाच्या शिवशाही एसटीबसमध्ये विराजमान केल्या. बसवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली व बस पंढरीच्या दिशेने रवाना झाली. या वेळी माउली-माउलींच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *