प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुणेकर तरुण अनिकेत साठे लष्करात झाला लेफ्टनंट


पुणे — नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे .त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे .

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी मध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांचे वडिल अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते .तरीही ते खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे .

अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फार मोठी मजल मारली आहे .त्यांचे शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले आहे .डिसेंम्बर 2016 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( NDA) च्या 137 व्या तुकडी साठी  अनिकेत साठे यांची निवड झाली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी तिल तीन वर्षे आणि इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथील एक वर्षाचे प्रशिक्षण अतिशय यशस्वी रित्या पूर्ण करून आज त्याने लेफ्टनंट पद मिळवले आहे .त्याबद्दल पुण्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील : ॲड. सदानंद फडके