मुंबई- कोरोनाचे संकट कमी होत आहे असे वाटत असतानाच आणि कोरोनावरील लस उपलब्ध होण्याच्या उंबरठ्यावर असताना ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने दाखल घेत पुन्हा एकदा काही निर्बंध जाहीर केले आहेत. राज्यामध्ये उद्यापासून( दि. २२ डिसेंबर) ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.