पुण्यात पुन्हा एकदा गव्याच्या दर्शनाने पुणेकरांची तारांबळ

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे –पुण्यात आज पुन्हा एकदा पुणेकरांना गव्याचे दर्शन झाल्याने मोठी खळबळ उडाली. पुण्यातील बावधन भागात महामार्गालगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्याच्या पलीकडे जंगलात हा गवा आढळून आला. हा परिसर वर्दळीचा असल्यामुळे सकाळच्यावेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नागरिकांच्या दृष्टीस गवा पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान आज या गावाला गव्याला सुरक्षितपणे त्याच्या जंगलातील अधिवासामध्ये सोडण्यात वनविभागाला यश आले आहे.

यापूर्वी 9 डिसेंबर रोजी पुण्यातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत आढळलेल्या गव्याला नागरिकांनी घातलेल्या गोंधळामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. मागच्या अनुभवातून शहाण्या झालेल्या रेस्क्यू टीमने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने आज गव्याला जंगलात जाण्यासाठी वाट करून दिली.
पुण्यात आज सकाळी पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली होती. गव्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन वनविभागाचे कर्मचारी पोलीस हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले होते. आज पुन्हा आढळून आल्याने प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची त्रेधा तिरपीट उडाली होती. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएलच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्याची आखणी करण्यात आली. यानंतर महामार्गावर गर्दी होऊ नये यासाठी अतिरिक्‍त पोलिस दल मागवण्यात आले. महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून गव्याला पुन्हा त्याच्या अधिवासामध्ये सोडण्यात सर्वच यंत्रणांना यश आले. गवा टेकडीकडे परतल्यानंतर सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.
13 दिवसांपूर्वी नऊ डिसेंबरला कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीच्या परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सर्व थरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *