हे सरकार कोडगं : संभाजीराजे यांच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार? -चंद्रकांत पाटील


पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनाम दिल्यास कोणावर परिणाम होणार आहे असा सवाल करत हे सरकार कोडगं सरकार आहे, त्यांना काही फरक पडत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांनी काही मागण्या करत राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिला आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून खासदारकीचा राजीनामा द्यावा असेही बोलले जात आहे. माझ्या राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत असे तर मी लगेच राजीनामा देतो असेही संभाजीराजे यापूर्वी म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांनी राजीनामा दिल्यास कोणावर परिणाम होणार आहे असा सवाल केला आहे.तसेच. संभाजीराजे छत्रपती यांची हेरगिरी होत असेल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे. या संदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

अधिक वाचा  फडणवीस म्हणाले कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही.. फक्त हा पॅटर्न चालणार...

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, पवार-फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. पवारांचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे. त्यांची प्रकती बरी नव्हती. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस गेले. त्यात राजकीय काहीच नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आरक्षणाशी केंद्राचा काय संबंध?

ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबंध? या निर्णयाशी केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने दीड वर्षापासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं. त्यामुळे सरकारने आधी मागासवर्गीय आयोग नेमावा आणि कोर्टाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमदार महेश लांडगेंना समज देणार

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढून गर्दी जमवली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले,  लांडगे यांनी लग्नात मिरवणूक काढणे आणि गर्दी जमवणे चुकीचेच आहे. त्यांना पक्षाकडून समज दिली जाईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love