मनपा सेवकांसाठीअंशदायी आरोग्य योजनाच(CHS) हवी : खाजगी विम्याचा घाट नको- राजीव गांधी स्मारक समितीची मागणी


पुणे- पुणे महापालिका सेवकांसाठी अस्तित्वातील अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून मेडिक्लेम अंतर्गत खाजगी विम्याचा घाट प्रशासक पुन्हा घालु पहात आहेत ही खेदाची बाब असून, पुणे मनपा प्रशासकांनी (अस्तित्वातील केंद्र व राज्य सरकार मान्य) अंशदायी आरोग्य सेवा योजना सूरू ठेवावी व “नविन लोकप्रतिनिधींची बॅाडी अस्तित्वात आल्यावरच नविन धोरणात्मक बाबींवर निर्णय घ्यावेत” अशी मागणी राजीव गांधी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज विभागीय आयुक्तांना दिल्याचे काँग्रेस नेते व राजीव गांधी समिती संस्थापक गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..

वास्तविक या बाबत पुर्वी देखील मनपा सेवक संघटनांनी खाजगी विमा योजनांचा घाट घालू नये’ या करीतां आंदोलन ही सूरू केले होते परंतू त्याच दिवशी मनपा सेवक संघटनेची समजुत काढून, मनपा प्रशासनाने ते रद्द करण्याचे आश्वासन देऊन, अंशदायी आरोग्य सेवा योजनाच पुर्ववत सुरू राहील असा भरवसा दिला मात्र  प्रत्यक्षात मात्र ऊलटे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे..! सीएचएस विमा योजनेची मनपा पोर्टल वर विमा कपन्यांची टेंडर्स मागवण्यात आली आहेत व प्रशासकांचे समोर विमा कंपन्यांचे सादरीकरण देखील करण्यात आले.. ही खेदाची बाब असून या बाबत पुणे मनपा नक्की काय करू ईच्छीत आहे…? वास्तविक मनपा लोकप्रतिनिधींची मुदत संपलेमुळे मनपा-बरखास्त झाली असतांना.. मा आयुक्त प्रशासक या नात्याने कोणाच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत.? राज्यातील सत्तापक्षाचा दबाव आहे काय.? अशी विचारणा देखील राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली आहे.

अधिक वाचा  Ramlala idol made from Krishna stone: कृष्ण शिलेपासून बनविलेल्या रामललाच्या मूर्तीचे ही आहेत खास वैशिष्ठ्ये

तसेच, मनपाचे नविन लोकप्रतिनिधी (बॅाडी) निवडून येईपर्यंत (धोरणात्मक निर्णय न घेण्याचे  संकेत असतांना) प्रशासक विक्रम कुमार यांनी नवीन घोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला.

खाजगी मेडिक्लेम कंपन्याच्या दावणीला मनपा सेवकांना बांधणे अन्याय कारक असुन, कामगार बंधूच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे ही सुचित केले.

या शिष्टमंडळात, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी, सर्वश्री सुर्यकांत ऊर्फ बाळासाहेब मारणे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, संजय अभंग, लहू आण्णा निवंगुणे, ॲड फैयाज शेख, विकास दवे, अमर गायकवाड उपस्थित होते. सौरभ राव यांनी यामध्ये जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले..

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love