पुणे—राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुंठेवारी संदर्भात घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आपल्या हिताचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आनंद झालेले १०-१२ गावांचे ग्रामस्थ अजित दादांचा सत्कार करण्यासाठी विधानभवन येते आले होते. बैठक संपल्यानंतर अजितदादा बाहेर आल्यावर पक्षाच्या प्रवक्त्यांनी दादांना सत्कार घेण्याची विनंती केली खरी परंतु, शीघ्रकोपी असलेले दादा संतापले आणि त्यांनी सत्कार घेण्याऐवजी सर्वांसमोर पक्षाच्या प्रवक्त्याची खरडपट्टी केली तर सत्कार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही अरे काम करू की सत्कार स्वीकारत फिरू? अशा शब्दांत सुनावले. त्यामुळे पक्षाच्या प्रवक्त्याचा आणि कार्यकर्त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्याने अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला.