अजित दादांच्या मिश्किल टिप्पणीने उडाले हास्याचे फवारे

राजकारण
Spread the love

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामाचा झपाटा हे एक समीकरण बनले आहे. अजित दादांच्या या गुणांचा धसका अनेक अधिकाऱ्यांनीही घेतलेला असतो. यांचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. याबरोबरच दादा मूडमध्ये असतील तर ते एखाद्या गोष्टीवरून मिश्किल टिप्पणीही करतात आणि गंभीर असलेल्या वतावरणात एकदम हास्याचे फवारे उडतात.

असाच काहीसा प्रकार आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये घडला. पुण्यामध्ये सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मध्यंतरी मेट्रोच्या प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी दादांनी पहाटे सहाची वेळ निवडली होती. नुसती पहाटे सहाची वेळ न देता ते स्वत: त्याठिकाणी वेळेअगोदर पोहोचले होते. आज बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना ‘माझ्यामुळे अनेकांना सकाळी लवकर उठावे लागते. अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी देखील कामाच्या ठिकणी पोहचावे लागते. या अधिकाऱ्यांच्या बायका म्हणत असतील कुठून बारामतीत नोकरीला आलो’ अशा शब्दात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिमटा काढला. यावर सभागृहात देखील हशा पिकला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *