MLA disqualification case Result : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला  उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय

MLA disqualification case Result , Assembly Speaker, Rahul Narvekar , Uddhav Thackeray, Shiv sena , Shiv sena Shinde Group, Eknath Shinde's Shiv Sena is the real Shiv Sena,
MLA disqualification case Result , Assembly Speaker, Rahul Narvekar , Uddhav Thackeray, Shiv sena , Shiv sena Shinde Group, Eknath Shinde's Shiv Sena is the real Shiv Sena,

MLA disqualification case Result – महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या (Shivsena)  आमदार अपात्र प्रकरणाचा ( MLA disqualification case ) निकाल विधानसभेचे अध्यक्ष ( Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी  उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)  यांना धक्का देणारा दिला आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय हा ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य असल्याचे सांगत  शिवसेनेच्या घटनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा खरी शिवसेना आहे असा निकाल त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सर्व 16 आमदार पात्र ठरले आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही पात्र ठरविण्यात आले आहे. (Eknath Shinde’s Shiv Sena is the real Shiv Sena)

शिवसेनेच्या (शिंदे गट) (Shivsenaa Shinde Group)  16 आमदारांच्या अपात्र प्रकरणाच्या निकालाचे वाचन राहुल नार्वेकर यांनी 4.30 पासून सुरू केले. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल वाचताना राहुल नार्वेकर यांनी काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,

अधिक वाचा  सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही- अजित पवार

माझ्यासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शिवसेनेत २१ जून २०२२ पासून दोन गट झाल्याचंसमोर आलं. त्यामुळे पुढील प्रश्नांवर विचार केला.

१. २०१८ सालचं पक्षातं नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार होतं का?

२. पक्षप्रमुखाची इच्छा हीच पक्षाची इच्छा मान्य केली जायला हवी का..?

२०१८ मध्ये पक्षात कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. पण मला पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा नाही.निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ साली मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१८ साली शिवसेना पक्षाची निवडणूक आयोगासमोर सादर झालेलीच घटना स्वीकार करता येईल. त्यानंतर पक्षीय घटनेत करण्यात आलेले बदल निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यानंतर झालेले बदल मी निर्णय घेताना ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर फुटीच्या आधी सादर झालेली घटना ग्राह्य धरण्याचा विचार करण्यात आला.

अधिक वाचा  राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या निकालपत्रातील मुद्द्यांचा संदर्भ दिला. तसेच, निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या राज्यघटनेबाबतही टिप्पणी केली. शिवसेनेच्या राज्यघटनेचा, पक्षीय संघटने, विधिमंडळ पक्षाचा विचार करून कोण मूळ राजकीय पक्ष आहे, याचा विचार करण्यात आला. समोरआलेल्या पुराव्यांनुसार निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या राज्यघटनेबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती नाही. त्यामुळे संदर्भासाठी योग्य ती पक्षाची घटना घेणं हा माझ्यासमोर पर्याय होता. खरी शिवसेना कोणाची हे ठरविण्याचा अधिकार मला म्हणजे विधानसभा अध्यक्षांना आहे. पक्षाच्या घटनेचा आधार हा केवळ नेतृत्वाची रचना तपासण्यापीरताच असल्याचेही नार्वेकर यांनी म्हटले आहे.  

पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय हा ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य करत शिवसेनेच्या घaटनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट ही खरी शिवसेना आहे असा निकाल  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love