शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच: बावणकुळेंचा हल्लाबोल

History of mergers of Pawar since 1977
History of mergers of Pawar since 1977

पुणे(प्रतिनिधि)–राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरावणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही, असा सवाल अलिकडेच उपस्थित केला आहे. त्यासंर्दभात बावनकुळे यांनी पवार यांचा समाचार घेतला. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? असा सवाल करत राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, याची आधी माहिती घ्यावी, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिरप्रश्नी पवारांना दिला आहे.

अधिक वाचा  लोकसंगीत आणि तबला -खंजिरी - कथ्थक च्या जुगलबंदी ने गाजवला 'तालचक्र' महोत्सवाचा पहिला दिवस

शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love