लॉकडाऊनबाबत काय म्हणाले महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे–पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या  अफवा पसरवल्या  जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन जारी करण्यात येणार नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शहरातील काही भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात सकाळपासूनच पत्रे लावण्यात आल्याने पुन्हा शहरात लॉकडाऊन लावण्यात येणार आहे का? असा सवाल नागरिकांना सतावत होता. त्यात सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने एक आदेश काढून प्रभाग क्र. ४२ व परिसरातील भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले व नवीन नियमावली जाहीर केली. त्यामुळे, नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.त्यावर, पुणे शहरात कुठेही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

अधिक वाचा  एनडीए करणार ३५० पार : अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी :ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत

पुणे शहर हे देशातील करोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनला आहे. याबाबत मुंबई आणि दिल्ली या महानगरांनाही पुण्याने मागे टाकले असून दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना करोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर, मृतांचा आकडाही सरासरी चाळीशी गाठत आहे.दर काही दिवसांनी नव्याने कंटेन्मेंट झोन निर्मित करतो. जिथे रुग्ण संख्या कमी झाली तो भाग वगळतो. पुण्यात नव्याने काही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे केलेली आहेत. तिथे व्यवस्था म्हणून त्याभागातील काही रस्ते, गल्ली येथे पत्रे लावण्यात आली आहेत. शहरातील काही भागांमध्ये व सिंहगड रोड येथील काही भागात ही पत्रे लावण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे देखील कुठलाही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. जो आदेश सिंहगड क्षेत्रीय कार्यलयातील अधिकाऱ्यांनी काढला आहे, तो आदेश मागे घेतला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love