छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या गैरवापराबद्दल काय म्हणाले रोहित पवार?


पुणे-महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन   छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. अशा प्रकारे गैरवापर करणे ही अक्षम्य चूक आहे अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील एका मोठ्या विडी कंपनीला खडसावलं आहे.

महापुरुषांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा फंडा आजकाल सर्रासपणे चालू आहे. यावरती आता आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेत ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवा,’ अशी समज पुण्यातील एका ‘बिडी’ कंपनीला दिली आहे. आपल्या महापुरुषांच्या नावाचा अशाप्रकारे गैरवापर करणं हि अक्षम्य चूक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हंटल आहे. आपल्या ट्विट मधून ‘महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा,’ असं म्हणत रोहित पवारांनी कंपनीला समज दिली आहे.

अधिक वाचा  टीईटी परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेकडे मिळाले आणखी घबाड

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. असं आमदार रोहित पवारांनी कंपनीला खडसावलं आहे.

रोहित पवारांनी केलेल्या या मागणीला ट्विटरवर अनेकांनी पाठिंबा दिलाय. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकारावर आवाज उठवल्याप्रकरणी त्यांचे एकाने अभिनंदन केले असून याचा योग्य तो पाठपुरावा करुन हा प्रकार पवार थांबवतील, असा विश्वास देखील एका युजरने दाखवला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love