Threatening to take a nude video of a minor girlfriend and make it viral

#धक्कादायक : अल्पवयीन प्रेयसीचे न्यूड व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी : तरुण जेरबंद

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–एका तरूणाचे त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचे न्यूड व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराच्या छळाला कंटाळून संबंधित अल्पवयीन मुलीने फिनाईनल पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने हा प्रकार तिच्या घरच्यांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तिला रोखत तिचा जीव वाचवला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कपिल वाल्हेकर (वय १८) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल वाल्हेकर यांचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने तिचा गैरफायदा घेतला. ती मुलगी बाथरूममध्ये असताना कपिलने बाथरूमची काच काढून तिचा न्यूड व्हिडीओ बनवला. नंतर त्याने हाच व्हिडीओ तिला दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिचा अनन्वित छळ केला. त्याच्या या छळामुळे आणि धमक्यांमुळे ती अल्पवयीन मुलगी खूप त्रासली होती. अखेर तिने यातून सुटकेसाठी स्वत:चंच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने नातेवाईकांमुळे तिचा जीव वाचला.

हे प्रकरण घरी कळल्यानंतर घरच्यांनी तिला धीर दिला आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी कपिल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *