बॉलीवूड उत्तरप्रदेशला हलविण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिला हा इशारा


मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विविध कारणांमुळे गाजते आहे. सुशांतसिंग मृत्यू  प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौत हिने घेतलेली भूमिका, त्यावरून उठलेलं वादळ राजकारणापर्यंत पोहोचले आहे. हे वादंग सुरु असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून ‘बॉलीवूड’ उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत के काय अशी चर्चा सुरु झाली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक इशारा दिला आहे. बॉलीवूड संपवण्याचा किंवा इतरत्र हलविण्याचे कारस्थान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

लॉकडाऊनमुळे गेली काही महिने मल्टीप्लेक्स, सिनेमागृहे बंद आहेत. ती सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मल्टीप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी ऑनलाईन चर्चा केली. राज्यातील चित्रपटगृहे लवकरच सुरु करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच बॉलिवूडला संपवण्याचा किंवा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र बॉलीवूड संपवण्याचा किंवा इतरत्र हलविण्याचे कारस्थान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

अधिक वाचा  दिल्लीत परवानगी न दिल्यास अण्णा राळेगण सिद्धीतच उपोषणाला बसणार

 महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love