१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन मविआ करते का? मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान

पुणे–भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं पण मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन तीव्र करु, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, “१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानेही नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह विकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे एकप्रकारे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठिशी घालण्याचाच प्रकार आहे. “

अधिक वाचा  #Fadnavis Letter To Sharad Pawar: शरद पवारांच्या गुगलीवर फडणविसांचा टोला

ते पुढे म्हणाले की, “घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच आरोपपत्र  दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही.

म. गांधीजींच्या पुतळ्यासमोरील आंदोलनाला कोणी परवानगी दिली याची चौकशी करा 

मंत्रालयाच्या आवारात किंवा आसपासच्या परिसरात मराठा समाजबांधवांना, ओबीसी राजकिय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करु इच्छिणाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाही. पण दुसरीकडे नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. त्यामुळे या आंदोलनास कोणी परवानगी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.  

“संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेनं तातडीने घेतला. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने

शिवसेनेच्या सावरकर प्रेमावर विचारले असति पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीसोबत सत्तेत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊच शकत नाही. कारण तिघांनी एकत्रित येऊन ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरवला आहे, त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली; तर त्यांना चालतं. पण सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल, तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करत असते, ” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

भाजपचे नेते हे महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असे सारखे सांगत आहेत. त्यावर अजित पवार सकाळी म्हणाले, शरद पवार, सोनिया गांधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेपर्यंत हे सरकार पडणार नाही. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, या सरकारनेही आम्हाला कमी त्रास दिलेला नाही. पण आम्ही प्रत्येकवेळेस आम्ही न्यायालयात गेलो.अजित पवार जे म्हटले की हे सरकार पडत नाही त्याबद्दल मला काही बोलायच नाही.

अधिक वाचा  सांगली महापालिकेतील झटक्यानंतर भाजप पुण्यात सावध : नगरसेवकांसाठी काढला 'व्हिप'

मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते ज्या मेट्रो स्टेशनला भेट देणार आहेत त्या मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी मुंबईला आणि पुढे दिल्लीला पाठवण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार व भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करु.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love