# आता मागे नाही राहायचे : कोण होणार करोडपतीमध्ये आता 2 कोटी जिंकण्याची संधी

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

खरं तर ‘कोण होणार करोडपती च्या हॉटसीट वर बसून करोडपती होण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या शो मध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळते. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे नाही राहायचं असं सांगत ‘कोण होणार करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी आता एक नाही तर तब्बल 2 करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच कोण होणार करोडपती कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे. प्रश्नोत्तराच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर आता मागे नाही राहायचं असे ब्रीदवाक्य घेऊन येत आहे कोण होणार करोडपतीचा येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याच स्वप्न कोण होणार करोडपती या कार्यक्रमाने सामान्य टीव्ही प्रेक्षकांना दाखवलं, अन् अल्पावधीतच हा शो तूफान लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील उत्कंठावर्धक प्रश्नांच्या खेळाने कित्येक सामान्य माणसाचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवल, अन् आता पुन्हा एकदा हा मंच स्पर्धकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज झाला आहे. कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यपणे कार्यक्रमाच्या प्रसारणाला सुरुवात होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन सुरू होते. मात्र यंदा ज्या इच्छुक स्पर्धकांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा संधी मिळालेली नाही अशा स्पर्धकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासाठी काय करावे लागणार ? हे जाणून घेण्यासाठी कोण होणार करोडपती’ चा 29 मे रोजीचा पहिला भाग पाहायला विसरू नका. पहिल्या भागात कि हि दुसरी संधी कशाप्रकारे त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे.

‘कोण होणार करोडपती या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या उत्कंठावर्धक खेळाबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच दिलखुलास आणि बहारदार सूत्रसंचालन हे देखील प्रमुख आकर्षण आहे. खेडेकरांची स्पर्धकांना आपलेसे करून बोलते करण्याची पद्धत आणि त्यांचे प्रभावी संवाद कौशल्य प्रेक्षकांचं मनं जिंकून जाते. कधी भावूक करणारे क्षण तर कधी प्रेरणा देणारे किस्से हे देखील नेहमीच या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. ‘कोण होणार करोडपती’ मध्ये समाजातील विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांचा सहभाग असतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *