राजेश पांडे यांची भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे–भाजप चे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खा. गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर,शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आ.माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. मुक्ता टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पणे पूर्ण करेन असा विश्वास राजेशज पांडे यांनी व्यक्त केला आहे. येत्या निवडणुकीत शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून पुनःश्च एकदा भाजप च मनपाच्या सत्तास्थानी येईल आणि पुणे शहराच्या विकासाला गती देईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *