‘उद्धवा धुंद तुझा दरबार’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणत वारकरी व भाजपचे आंदोलन


पुणे—  राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली. मात्र, मंदिरे बंद ठेवल्याने भाजपासह धार्मिक संघटनांना एकत्र करून आज (मंगळवारी) संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजीवन समाधी मंदिरासमोर ‘उद्धवा धुंद तुझा दरबार’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणत वारकरी व भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला. तर पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सहा ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरं बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली. 

अधिक वाचा  नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात पदार्पण करणार

 वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन घेता येत नसल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.राज्यात दारुची दुकाने, हॉटेल्स सुरू होत आहेत. मात्र, मंदिरे बंद ठेवली जातात. राज्य सरकारची ही दुटप्पी भुमिका आहे. त्यामुळे वारकरी समाज्याच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ संत ज्ञानेश्वर माउलींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी भाजपाच्या वतीने यावेळी करण्यात आली. आळंदीत आज (मंगळवारी) भाजपाच्यावतीने संजीवन संमाधी मंदिरासमोर टाळ, मृदगांच्या नादात हरिनामाचा गजर करत ही मागणी करण्यात आली.

कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरूवात करण्यात आली.  तसेच, चिंचवड गाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारतही आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील सहा मंदिरांच्या आवारात दिवसभरात आंदोलन करण्यात आले.  

अधिक वाचा  प्रतीक्षा संपली : उद्या बारावीचा ऑनलाइन निकाल

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love