असे काय लिहिले राज्यपालांनी पत्रात,ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरमरीत उत्तर दिले? राज्यपालांचे पत्र..

राजकारण
Spread the love

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे खरमरीत उत्तर पत्र लिहून दिले. इतक्या दिवस शांत आणि संयमी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदम का रागावले? असे काय राज्यपालांनी त्यांच्या पत्रात लिहिले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सनक गेली आणि त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून सुनावले? .. बघू या राज्यपालांनी काय म्हटले होते त्यांच्या पत्रात …

प्रिय उद्धव ठाकरे,

जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशई संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय न पुढाऱ्यांचाही समावेश होता.

तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे.

मी इथे नमूद करु इच्छितो की दिल्लीत 8 जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरं सुरु करण्यात आली होती. मंदिरं सुरु झाल्यानंतर तिथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेलं नाही. मी विनंती करतो की कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करम्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्राप्त झालेली तीन प्रेझेन्टेशनही जोडत आहे.

राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *