आम आदमी रिक्षाचालक संघटना आणि पुणे मेट्रोचा करार: पुण्यात प्रवाशांना देणार सेवा..

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या पाच वर्षाच्या वाटचालीत मनाच्या टोपीमध्ये अजून एक तुरा रोवला गेला आहे..पुणे मेट्रो कंपनीने आज आम आदमी रिक्षाचालक संघटनेबरोबर ( first mile to last mile)करार केला आहे. ह्यामुळे हजारो रिक्षाचालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यात मदत होणार आहेच परंतु, भविष्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.

लवकरच पुण्यामध्ये मेट्रो धावणार आहे. आम आदमी रिक्षाचालक संघटनेणे रिक्षा बोलावण्यासाठी स्वतःचे मोबाईल अँप विकसित केले आहे.रिक्षा चालकाला हे अँप दररोज वापरण्यासाठी फक्त रुपये 10 खर्च येणारआहे.ह्या अॅ पवरून मेट्रोच्या अॅपला सलग्न केले जाणार आहे.जेणे करून प्रवास्याला रिक्षात बसल्या बसल्या मेट्रोचे तिकीट काढता येईल.तसेच मेट्रोतून उतरण्याआधी रिक्षा बोलावण्याची सुविधा असणार आहे.

हा उपक्रम पुणे आणि पिंपरीचिंचवडसाठी आमआदमी रिक्षा संघटना राबवणार आहे.   पुणे मेट्रोचे संचालक श्री घाडगे साहेब तसेच श्री मनोजकुमार उपमहा प्रबंधक पुणे मेट्रो,श्री विजय कुंभार आम आदमी पार्टी महाराष्ट्रराज्य संघटक,श्री. श्रीकांत आचार्य आम आदमी पार्टी वाहतूक विभाग महाराष्ट्र अध्यक्ष ,जेष्ठ आप कार्यकर्ते किशोर मुजुमदार,श्री अजगर बेग अध्यक्ष आम आदमी रिक्षाचालक संघटना,गणेश ढमाले,  उपाध्यक्ष आम आदमी रिक्षाचालक संघटना ,आनंद अंकुश सचिव आम आदमी रिक्षाचालक संघटना ,केदार ढमाले खजिनदार तसेच आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड मधून सागर सोनवणे,राघवेंद्र राव व इतर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *