मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानाची सांगता : यापुढील काळातही श्रीनाथ भिमाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू राहणार अभियान

Voter Registration and Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana campaign concluded
Voter Registration and Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana campaign concluded

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे पुणे लोकसभा समनव्यक प्रभारी आणि पुणे मनपाचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या आठवडाभर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानाची यशस्वी सांगता झाली. दिनांक ७ जुलै ते १४ जुलै दरम्यान हे अभियांन राबविण्यात आले. दरम्यान, या अभियानाची सांगता झाली असली तरी यापुढील काळातही श्रीनाथ भिमाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे अभियान सुरू राहणार असल्याची माहिती भिमाले यांनी दिली.

पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून दिनांक ७ जुलै ते १४ जुलै दरम्यान पर्वती विधानसभा मतदार संघात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाची सांगता अरण्येश्वर येथील तावरे बेकरी जवळील केंद्रांवर करण्यात आली.

अधिक वाचा  एमआयटी एडीटी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ३० केंद्रांच्या माध्यमातून  या अभियानाला पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यात यश आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य पोहोचाव्यात, हाच या अभियानाचा हेतू होता. नागरिकांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे भिमाले यांनी यावेळी सांगितले.

गेल्या ७ दिवसांमध्ये या सर्व केंद्रांवर आलेल्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. या नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये समावेश करणे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अभियान सप्ताहाचा समारोप झाला असला तरी हे काम यापुढील काळातही माझ्या  मार्केट यार्ड, संदेश सोसायटीमधील जनसंपर्क कार्यालयात सुरू राहणार आहे.  त्यामुळे या अभियानात ज्यांना सहभागी होता आले नाही अशा नागरिकांनी भिमाले जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन भिमाले यांनी केले आहे.

अधिक वाचा  लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा 

दरम्यान, हे अभियान यशस्वी होण्यासाठी मदत केलेले सर्व कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे नगरसेवक व सर्व सहकाऱ्यांचे आणि या अभियानात सक्रियपणे सहभागी होत हे अभियान प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींचे देखील भिमाले यांनी मनापासून आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love