मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांची अनोखी मानवंदना

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये… या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौयांचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना दिली. या स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करताना पोलीस बांधवांसह सामान्यांचेही डोळे पाणावले. भारत माता की जय.. शहीद जवान, पोलीस अमर रहे… च्या घोषणांनी सारसबागेचा परिसर दुमदुमून गेला.

निमित्त होते. मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये आयोजित विशेष मानवंदना कार्यक्रमाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सागर पाटील, सहपोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, रमाकांत माने, आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, जगन्नाथ कळसकर, स्वाती देसाई, सोमनाथ जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी सी.एच. वाकडे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे यंदा ९ वे वर्ष होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले.

डॉ. अमिताभ गुप्ता म्हणाले, मुंबई हल्ल्याच्या घटनेला आज १३ वर्षे पूर्ण झाली. त्या घटनेमध्ये जे शहीद झाले, ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांची आठवण आपण ठेवायला हवी. काही पोलीस आमचे सहकारी होते, तर काही वरिष्ठ म्हणून त्यावेळी कार्यरत होते. जे हुतात्मा आपल्यासाठी शहीद झालेले आहेत, त्यांचे दहशतवादमुक्त भारताचे स्वप्न आपण पूर्ण करण्याकरीता सर्तक रहायला हवे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, प्राणाची आहुती देत शेवटच्या क्षणापर्यंत लढणा-या पोलीस बांधवांना आदरांजली अर्पण करीत आहोत. महापूर, भूकंप, कोविडसह सर्वच संकटात पोलीस, सैनिक कार्यरत असतात. संविधान दिन देखील आज आहे. डॉ. आंबेडकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य दिले. त्यांना देखील आज आदरांजली अर्पण करीत आहोत.

शिरीष मोहिते म्हणाले, मानवंदना कार्यक्रमासोबतच जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर व पर्यावरण जागृतीच्या कल्पना विद्याथ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. सुमारे १०० शाळांतील ५ हजार विद्याथ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, मनोहर देसाई, संदीप गायकवाड, नितीन होले, तन्मय तोडमल यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. मंडळाचे अमर लांडे, तन्मय तोडमल, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, सचिन ससाने, लाला परदेशी, दत्ता मिसाळ, अजय पंडित सुनील जाधव, सुरेश तरलगट्टी, अमय थोपटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. मिलींद भोई यांनी सूत्रसंचालन केले.

चित्रकला स्पर्धेचा निकाल

अ गट (इयत्ता १ली ते २री) – भूमी संगवार, वैष्णवी श्रीवास्तव, तन्मय देखणे, आर्यन चव्हाण, समर्थ तळेकर, व गट (इयत्ता ३री ते ४ थी) यशवंत गुप्ता, आर्यन पत्की, सनुजा पाटील, झोया वडसरीया, सात्विक गायके, सना नायकवडी, क गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) प्रथमेश वाघ, वेदांत पवार, समृद्धी अर्जुन, प्राची गुत्तेदार, सम्यक राऊत, यश गव्हाणे, संजना नावडकर, ड गट (इयत्ता ८ वी ते १० वी) सिद्धी कांबळे, श्रुती कांबळे, आकाश दुबे, संस्कार कळमकर, त्रिशा गोसके, सुश्मिता चट्टा, इशा ओड.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *