दोन कानाखाली द्यायला पाहिजे होत्या त्याच्या – कोणाला म्हणाले राज ठाकरे?


मुंबई- पुण्यात मागच्या आठवड्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने केल्यानंतर त्याचे पडसाद  राज्यभर उमटले. भाजपने शरजीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा डंख; करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख,छगन भुजबळ यांनीही शरजीलचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटले होते. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत शरजीलचा समाचार घेतला आहे.

30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तरुण शर्जील उस्मानी याने भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजाविरोधात आपत्तीजनक व भडकाऊ विधान केले होते. शर्जील उस्मानी याने आपल्या भाषणात ” आज का हिंदू समाज, हिंदुस्तान मे हिंदू समाज पुरी तरहा से सड चुका है, ये जो लोग लिंचिंग करते है, कत्तल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नई तरीके से हाथ धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे, क्या करते है लोग की वापस आ कर हमारे बीच खाना खाते है, उठते बैठते है, फिल्म देखते है, अगले दिन फिर किसी को पकडते, फिर कत्तल करते है और नॉर्मल लाईफ जीते है. अपने घर मे मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर मे पूजा भी कर रहे है, फिर बाहर कर यही करते है” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

अधिक वाचा  कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे- अरुंधती राय

याबाबत मुंबईत पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारले असता राज ठाकरे यांनी “ तिकडेच त्याला सडकावला पाहिजे  होता, दोन कानाखाली द्यायला पाहिजे होत्या त्याच्या, असा संताप व्यक्त केला. त्याला कोणी बोलायला लावले का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून  सध्या असेच सुरू असल्याचे नमूद केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love