भारतरत्न असलेल्या लोकांना ट्विट करायला सांगणे हे बरोबर नाही – राज ठाकरे

राजकारण
Spread the love

मुंबई – केंद्र  सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.

शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीजवळ घडत असलेल्या घटनांबद्दल पॉपस्टार रिहानाने एक ट्वीट केलं. किसान एकता मंचाने या ट्वीटला रिप्लाय देत या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि या वादळ तोंड फुटले. सोशल मीडियावरयावरून  रणकंदन माजलं. कारण आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी विरुद्ध भारतीय सेलिब्रिटी असे दोन गट बनले.

अभिनेत्री कंगना राणावतने याविरोधातली पहिली प्रतिक्रिया दिली. त्या पाठोपाठ भारतातले अनेक सेलिब्रिटी एकवटलेत. अगदी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यासोबतच अनिल कुंबळे, अजय देवगण, अक्षय कुमार, करण जोहर या सगळ्यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्यांनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा वापर केला होता.

शेतकरी आंदोलन हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न असून यावर बोलण्याचा अधिकार केवळ भारतीयांनाच आहे. तसेच आमची समस्या सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत, त्यामुळे इतरांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, अशी प्रतिक्रिया या सेलिब्रिटी मंडळीकडून देण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विट करत लिहिले होते की, भारत हा एक महान देश आहे आणि आपण सर्व भारतीय याबाबत गौरवान्वित आहोत. एक गौरवशाली भारतीयाच्या अनुषंगाने मला पूर्ण विश्वास आहे की, कोणताही मुद्दा किंवा समस्या असेल, जे एक देश म्हणून आपण सामना करत आहोत, ते आपल्या लोकांचे हित लक्षात घेता आपण शांततापूर्ण पद्धतीने सोडवण्यात सक्षम आहोत. जय हिंद.

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने  “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश म्हणून आपण एकत्र राहूया.” असे ट्वीट केले होते.

याबाबत राज ठाकरे यांनी “ती कोण बाई आहे. मला काही कळालं नाही. कोणतरी कुठेतरी बोलते आणि त्यावर सरकार उत्तर देतं तिला. मला सांगा ती ट्वीट करण्यापूर्वी तुम्हाला तरी माहिती होती का? जिच्या एका ट्वीटने तुम्ही सगळेजण तिला काहीतरी बोलताय आणि इतर सगळे म्हणतायत की आमच्या देशाचा प्रश्न आहे. आम्ही सोडवू. तुला नाक खुपसायची गरज नाही. पण मग अगली बार ट्रम्प सरकार असं जाऊनही भाषणं करायची गरज नव्हती. त्यांच्या देशाचा प्रश्न होता.” पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “प्रश्न असा आहे की, कोण मुलगी, कोणती गायिका? लता मंगेशकर, सचिन ही मोठी आणि साधी माणसे आहेत. एवढ्या मोठ्या भारतरत्न असलेल्या लोकांना ट्विट करायला सांगणे हे बरोबर नाही अशी नाराजीही ठाकरे यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *