Gaja Marne, Baba Bodke, Nilesh Ghaiwal, many on record criminals paraded at Police Commissionerate

#Record criminals paraded at Police Commissionerate: गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस आयुक्तालयात ओळख परेड : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला नामचिन गुंडांना दम

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

Record criminals paraded at Police Commissionerate : शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना(Innocence criminal) ओळख परेडसाठी(Recognition parade) पोलीस आयुक्तालयात(Police Commissionerate) मंगळवारी बोलावण्यात आले होतं. पुणे पोलिस आयुक्तपदाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या पोलिस आयुक्त(Police Commissioner) अमितेश कुमार(Amitesh Kumar) यांनी पुणे शहरातील पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात(Police Head Quarter) हजेरी लावली.(Gaja Marne, Baba Bodke, Nilesh Ghaiwal, many on record criminals paraded at Police Commissionerate)

आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम भरण्यात आला. गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, जंगल्या सातपुते, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होतं.

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? असा दमच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना भरला

राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *