मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू:२ जखमी


पुणे–‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज झालेल्या दोन विचित्र अपघातात  दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातांमुळे वाहतुक ठप्प झाली होती.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात  मुंबई पुणे एक्सप्रेसजवळील फूड मॉल जवळ एक अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हे दोन्ही अपघात खोपोली हद्दीत झाला आहे. त्यानंतर IRB यत्रंणा, वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम घटनास्थळी मदत कार्यासाठी पोहोचली. त्यानंतर वाहतूक यंत्रणेकडून तातडीनं पावलं उचलण्यात आल्याने सद्यस्थितीत हा मार्ग सुरळीत सुरू करण्यात आला आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  'सेवा तरंग' परिषदेत उलगडला सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा प्रवास