अजित पवार आम्हीपण तुमचे बाप आहोत – चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे-काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विजयी झाले आहेत. याचा संदर्भ देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना , अजित पवारांना स्वप्न पडत असतील पण उर्जा वाया घालवू नका, आम्ही पण तुमचे बाप आहोत, अशा शब्दांत टोला लगावला आहे.

भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकात पाटील बोलत होते.

काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य   विजयी झाले आहेत. याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, प्रभाग समितीच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वाया घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत.   

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या. आता स्वपक्षाचे ३०३खासदार आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जगात भाजपा हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे असा दावाही त्यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *