सामूहिक नमाज पठण करू नये यासाठी पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात  आले . कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी  दुवा मागण्यात आली.

सलग एकविसाव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. आज ९ ऑकटोबर  रोजी  दुपारी दीड वाजता ‘फेसबुक लाईव्ह’ पठण  करण्यात आले. मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातून सहभाग घेतला.

दर आठवड्यात शुक्रवारी दुपारी दीड वाजता जुम्मा नमाझचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते.आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद,शराफत अली  यांनी या उपक्रमादरम्यान  नमाज पठण केले.तर  आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *