पाकिस्तानमधील आयएसआयला संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या गद्दाराला अटक


नाशिक- नाशिक येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड  (एचएएल) या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती  पाकिस्तानमधील आयएसआयला पुरविणाऱ्या गद्दाराला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेला संशयित कर्मचारी गुणवत्ता- नियंत्रण विभागात होता. काही महिन्यांपूर्वी त्याची प्रक्रिया विभागात बदली करण्यात आली होती. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात त्याने आंदोलन केले होते. एचएएल या कंपनीच्या या कर्मचाऱ्याविरोधात कलम ३, ४ आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक वाचा  रावण टोळीच्या कराड येथून मुसक्या आवळल्या : गुंडा विरोधी पथकाची कारवाई

नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती ही व्यक्ती पाकिस्तानमध्ये आयएसआयला पुरवित असल्याची  गोपनीय माहिती मिळाली होती.  हा कर्मचारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. त्यावरुन या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love