रक्त चंदनाची तस्करी करणारे तिघे जेरबंद: 270 किलो रक्तचंदन जप्त


पुणे-रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 27 लाख रुपये किमतीचे 270 किलो रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पुण्याजवळील लोणी काळभोर परिसरात करण्यात आली.

विकी संजय साबळे (वय 19, रा. मांजरी), रोहित रवी रुद्राप (वय 20, रा. कोंढवा) यांच्यासह रक्तचंदनाचा पुरवठा करणाऱ्या अँनेल कन्हैया वाघमारे (वय 25, रा. कोंढवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस शहरात गस्त घालत असताना त्यांना कोंढवा परिसरातून एका वाहनातून काहीजण रक्तचंदन विक्री करण्यासाठी लोणी काळभोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातच आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता.दरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयास्पदरित्या जाणारी एक पिकअप गाडी दिसली. पोलिसांनी ही गाडी अडवून पाहणी केली असता आता त्यांना आतमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा आढळला. पोलिसांनी गाडीत असणाऱ्या विकी साबळे आणि रोहित रुद्रा याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी अँनेल वाघमारेकडून रक्तचंदनाचा साठा आणला असल्याचे सांगितले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 27 लाखांचे 270 किलो रक्तचंदन आणि गाडी असा 32 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण