भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

पुणे(प्रतिनिधि)–पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला आहे. त्यांचे आज पहाटे अपहरण झाले होते, ज्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होते. आरोपींनीच त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे आणि राजकारणातही मोठी चर्चा रंगली आहे.

हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना,पुणे शहरापासून जवळपास ४५ किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे.

अधिक वाचा  रूबी हॉल क्लिनिकमधील निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपी कोण होते? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण का केलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

या प्रकरणी पोलिसांकडून सतीश वाघ आणि आरोपींचा शोध सुरु होता. त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांचा यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  इ. १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर: मंडळाकडून सविस्तर माहिती उपलब्ध

सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली होती. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन अज्ञात आरोपी बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं.   त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असताना आता अचानक सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि हत्येमागचं गूढ वाढलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love