संकर्षण क-हाडे, मकरंद जोशी यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार 

This year's Young Artist and Young Entrepreneur Award to Sankarshan Karhade and Makarand Joshi
This year's Young Artist and Young Entrepreneur Award to Sankarshan Karhade and Makarand Joshi

पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, कवी संकर्षण क-हाडे आणि त्रिमूर्ती आॅटोडेको कॉम्पोनन्टस प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मकरंद जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, चारुहास पंडित, मंजुषा वैद्य, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, रोहित देशपांडे, मिलिंद दारव्हेकर, अंजली दारव्हेकर, मंदार महाजन, अभिजीत देशपांडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  सामाजिक न्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे- विजय सांपला

 शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज आॅडिटोरियम येथे शनिवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे असणार आहेत. तसेच भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे आदींना देण्यात आला आहे.

 पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच संकर्षण क-हाडे यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी देखील उपस्थितांना मिळणार आहे. सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे.

अधिक वाचा  #Rahimatpur's unique vision of interfaith equality and social unity : सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे रहिमतपुरात अनोखे दर्शन

 कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love