पुणे(प्रतिनिधि)—राजकारणी, व्हीआयपी यापैकी कोणीही एखाद्या मंदिरात दर्शनासाठी गेले तर भाविकांची कितीही मोठी दर्शन रांग असली तरी त्यांना पहिला दर्शनाचा लाभ दिला जातो. असे सर्वसाधारणपणे सर्वच ठिकाणी आपण बघतो. मात्र, हा पायंडा स्वत: मोडीत काढत पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या साधेपणाचे दर्शन घडवले. निमित्त होते मराठी नुतन वर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात घेतलेल्या दर्शनाचे.
त्याचे झाले असे की, मुरलीधर मोहोळ हे ग्राम गुढी उभारण्याकरिता तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या इथे गेले होते यानंतर मोहोळ यांनी यांनी तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी गेले.त्यावेळी गुढीपाडवा असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मुरलीधर मोहोळही सामान्य नागरिकांप्रमाणे दर्शनासाठी रांगेत उभे ठाकले. त्यांच्या याच साधेपणाने पुन्हा एकदा पुणेकरांची मने जिंकली आहेत. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत भाजपा नेते हेमंत रासने आणि कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरीच्या चरणी माथा टेकवला.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. हे तिन्ही नेते लोकसभेसाठी जोरदार प्रचार करत आहेत.