दिव्यांगांच्या कल्याणासाठी येमुल गुरुजी करत असलेले कार्य कौतुकास्पद-डॉ.गजानन एकबोटे


पुणे- “दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी काढले.

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिभा सन्मान समारंभ पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी भावेश भाटिया यांना दिव्य रत्न पुरस्काराने,यजुर्वेन्द्र महाजन यांचा दिव्य सेवारत्न पुरस्काराने तर प्रकाश मोहारे यांचा दिव्य क्रीडारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे होते.कॉसमॉस बँकेचे चेअरमन सी.ए.मिलिंद काळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. माधव जगताप, बडवे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या संचालिका सुप्रियाताई बडवे,पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रकाश भोईटे, SGM ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे संचालक श्री. रमेश पाटील, डी.सी.पी वैशाली माने,ज्येष्ठ वकील राजा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर

डीकाईचे संस्थापक अध्यक्ष श्री.रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले की, “दिव्यांग, वृद्ध, गोर-गरीब, शेतकरी, आदिवासी यांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देणे आमचा मुख्य उद्देश आहे.लोकसेवा, मानवसेवा, देशसेवा हीच खरी ईश्वरसेवा”.कार्यक्रमामध्ये दिव्यम्स सर्विस लाउनज व फूड इन्शुरन्स, फूड क्लेम,अन्न सुरक्षा बिमा या संकल्पनांचा देखील शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एकबोटे म्हणाले की “दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे.”

 SGM ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे संचालक श्री.रमेश पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.सी.ए. ललित पोफळे, दानेश शाह, प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे, राजुशेठ ओसवाल,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डीकाईच्या संचालिका निलिमा येमुल यांनी सर्वांचे स्वागत केले तर कार्यकारी संचालिका राजश्रीताई गागरे यांनी डीकाईच्या मागील उपक्रम व कार्याचा अवहाल सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीकाईचे प्रवक्ते कुणाल वाघ यांनी केले तर आभार प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love