कोरोनावरील ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ससून रुग्णालयात सुरुवात

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

पुणे— पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून (Serum Institute Of India) भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ (Covishild)या कोरोनावरच्या लसीच्या तिसरया टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाल्याची घोषणा पुण्यातील ससून रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून  ज्या स्वयंसेवकांना सहभागी व्हायचे आहे त्यांना नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनावर लवकरात  लवकर लस उपलब्ध व्हावी  यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे.  भारतातील १७ ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. दुसऱ्या व तिसर्या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगभरात लसीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मागणी केली जात आहे.

दरम्यान, दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली होते. अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने याची घोषणा केल्यानंतर सिरम इन्स्टिटय़ूटकडून भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI)  स्थगिती देण्यात आली होती.

त्यानंतर सिरम इन्स्टि्यूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा आदेशही  भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) देण्यात आला होता. करोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतलं जाऊ नये असं डीसीजीआयने आदेशात म्हटलं होतं.

मात्र, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतीय औषध नियंत्रक विभागाने  (DCGI) गेल्या  मंगळवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘कोव्हीशिल्ड’  या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली होती.  त्याचबरोबर डीसीजीआयने दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचण्यांना नवीन उमेदवारांची निवड करण्यास मनाई केलेला पूर्वीचा आदेश देखील फेटाळला होता. त्यामुळे सिरम भारतात करत असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’  या लसीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला होता.

त्यानंतर आज ससून रुग्णालयाकडून पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ या कोरोनावरच्या लसीच्या तिसरया चाचणीच्या प्रक्रियेची सुरुवातीची घोषणा केली. तसेच ज्या स्वयंसेवकांना या चाचणीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी  020- 8550960196  किंवा 8104201267  या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *