#दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर


पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून  घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत आहे. तसेच कोरोना झालेले रुग्णांची रिकव्हरीही चांगल्या पद्धतीने होत आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट हा 15.8 टक्क्यांवर गेला आहे. तर रिकव्हरी रेट हा 89.6 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आपोआपच कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे तर मध्यंतरी रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाट मिळण्याला जी अडचण निर्माण झाली होती तीही कमी झाली आहे. आता सध्या कोरोंनाबाधित रुग्णांना खाट सहजपणे उपलब्ध होत आहे. सध्या  भारताचा कोरोना रिकव्हरी रेट हा 86 टक्के, तर महाराष्ट्र राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा 82 टक्के इतका आहे. तसेच मुंबईच्या तुलनेनेही पुण्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.

अधिक वाचा  अजित पवार यांना कोरोनाची लागण:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

 काल (12 ऑक्टोबर) पुण्यात 351 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 950 रुग्णांना घरी सोडण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा चढता आलेख घसरला असून सध्या  पुणे शहरात 12 हजार 285 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 856 गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love