कोरोनाच्या संकटाची दाहकता ‘रेडलाईट एरिया’पर्यंत: सांगा कसे जगायचे?


पुणे—कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक परिस्थितीने ग्रासले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या दाहकतेचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा झाला आहे याचे भीषण चित्र एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्यातील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समोर आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यापासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या या महिलांना आता देहविक्रीचा व्यवसाय सोडून भूक भागवण्यासाठी पर्यायी काम हवं आहे. (Leaving the business of prostitution requires alternative work to satisfy hunger).परंतु, शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले आहे.त्यांना कोणते आणि कसे काम देणार हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.(Corona crisis flares up to ‘redlight area’)

अधिक वाचा  पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय: महापौर

पुण्यातील बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची वसाहत म्हणून पाहिलं जातं आहे. या भागात सुमारे सातशे कुंटणखाने आणि जवळपास 3 हजार देहविक्रेत्या स्त्रिया असल्याचे सांगितले जाते. यातील 300 स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 87 टक्के महिलांनी सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वीही त्यांना देहविक्रीतून कुटुंबाचे पालनपोषण करण्याएवढं उत्पन्न मिळत होतं. मात्र आता त्यांना तेही मिळत नाही. मात्र शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले आहे.

कोरोनाच्या साथीनंतर मूळच्याच तुटपुंज्या उत्पन्नातही मोठी घट झाली. त्यामुळे आता अवस्था बिकट झाली आहे. त्यातूनच कर्जाचे ओझे वाढले आहे. परिणामी बहुतेक सर्वच स्त्रियांना पर्यायी काम-व्यवसायाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आहे. या महिलांपैकी 82 टक्के महिला 25 ते 45 या वयोगटातील आहेत. तर 84 टक्के महिला अशिक्षित आहेत. त्यातील 16 टक्के मुली शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते सोडून या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे 84 टक्के महिलांना कोरोनाच्या या संकटात  देहविक्री करण्याची भीती वाटते. ग्राहकांच्या संपर्कातून त्यांनाही कोरोनाची बाधा झालीच तर आयुष्य उध्वस्त होण्याची चिंता त्यांनाही सतावते आहे. किमान ४५-५० टक्के महिला या मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोग अशा विविध दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत. अशातच कोरोनाची बाधा झाली तर मृत्यूशी गाठ ठरलेली आहे. त्यामुळेच आता हा व्यवसायच नको, पण जगण्यासाठी पर्याय शोधत आहेत.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत असलेल्या दुसऱ्या गाडीत आमदाराचा मुलगा होता : नाना पटोलेंचा दावा; सीबीआय चौकशीची मागणी

संस्थेच्या म्हणण्यानुसार, देहविक्री करण्याऱ्या महिलांना आधीपासून अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी पुनर्वसनाची संधी दिली पाहिजे. यात सामाजिक संस्था आणि सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे हे मात्र जळजळीत सत्य आहे. राज्य सरकार, समजाकल्याण विभाग, महापालिका अथवा स्वयंसेवी संस्था यांनी या विषयावर तत्काळ गंभीर विचार करून या नरकयातनांतून कायमची सुचका करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love